A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
धुंदित गंधित होउनी

धुंदित गंधित होउनी सजणा
प्रीतीत रंगुनी जाऊया
छेडित ये प्रीतसंगीत सजणा
प्रीतीत रंगुनी जाऊया
ये सजणा !

कुंजात या गंधलेली फुले
माळुनी जाई झुले
गंधात ही धुंद झाली चमेली
गुलमोहराला भुले
तुझी सखी तुझ्यासवे ही !

पानांतुनी रेशमी चांदणे हे
मोहुनी येई करी
गाण्यातले सूर हे अमृताचे
दाटुनी आले उरी
अशी घडी युगायुगाची !
कुंज - वेलींचा मांडव.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.