A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ध्यान करु जाता मन

ध्यान करु जाता मन हरपले ।
सगूण ते झाले गुणातीत ॥१॥

जेथे पाहे तेथे राघवाचे ध्यान ।
करी चापबाण शोभतसे ॥२॥

राम माझे मनी राम माझे ध्यानी
शोभे सिंहासनी राम माझा ॥३॥

रामदास ह्मणे विश्रांती मागणे
जीविचे सांगणे हितगूज ॥४॥
चाप - धनुष्य.
हितगूज - हिताची गुप्‍त गोष्ट.