A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
डोळ्यांवरून माझ्या उतरून

डोळ्यांवरून माझ्या उतरून रात्र गेली
वचने मला दिलेली विसरून रात्र गेली !

डोळ्यांत जन्म सारा दाटून डोह झाला
अश्रूंत चंद्र माझ्या विखरून रात्र गेली !

मी मानिले मनाशी, माझेच सर्व तारे
स्वप्‍नात हाय माझ्या बहरून रात्र गेली !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.