A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दत्तराज पाहुनी आज

दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी

औदुंबरी नित्य वसे, भक्तकाम पुरवितसे
कमलनयन श्याम दिसे, धन्य तो जनी

अनसूया ज्याची माय, दृढ धरिले ज्याचे पाय
त्याचे चरित वर्णू काय, सकळ जो जनी

विनायक दास दीन, जळाविना जैसा मीन
ब्रह्मा-विष्णु-महेश तीन आठवी मनी
गीत -
संगीत -
स्वर- आर‌. एन्‌. पराडकर
गीत प्रकार - भक्तीगीत, दिगंबरा दिगंबरा
अनसूया - अत्रि ऋषींची पत्‍नी. दत्त व दुर्वास ऋषी यांची माता. ब्रम्हा, विष्णु व महेश यांनी हिच्या पातिव्रत्याची कसोटी पाहण्याचा प्रयत्‍न केला असता हिने आपल्या तपोबलाने त्यांना मुले बनविले. हे तिघे मिळून दत्तात्रय अवतार झाला.
मीन - मासा.