एकाच एकाच वेळे
एकाच एकाच वेळे दोघांचे डोळे
दाटून दाटून आले; वाहूं न गेले
जळत जळत दिवा विझत गेला
झाकत झाकत हवा पाऊस आला
भरले दोघांनी पेले, ओठांशीं नेले
काळोख गर्जत आले नदी नि नाले
कोणत्या दोन त्या लाटा जवळ आल्या
वाकड्या हृदयवाटा जोडीत गेल्या
बाहूंत बंदिस्त केला प्रत्येक दीस
असाच फुलांचा झाला केवळ वास
एकाच एकाच वेळे दोघांचे डोळे
दाटून दाटून आले; वाहून गेले
दाटून दाटून आले; वाहूं न गेले
जळत जळत दिवा विझत गेला
झाकत झाकत हवा पाऊस आला
भरले दोघांनी पेले, ओठांशीं नेले
काळोख गर्जत आले नदी नि नाले
कोणत्या दोन त्या लाटा जवळ आल्या
वाकड्या हृदयवाटा जोडीत गेल्या
बाहूंत बंदिस्त केला प्रत्येक दीस
असाच फुलांचा झाला केवळ वास
एकाच एकाच वेळे दोघांचे डोळे
दाटून दाटून आले; वाहून गेले
गीत | - | आरती प्रभू |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | रवींद्र साठे, उत्तरा केळकर |
गीत प्रकार | - | भावगीत, युगुलगीत, नयनांच्या कोंदणी |
टीप - • काव्य रचना- २ फेब्रुवारी १९६१. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.