एवढेतरी करून जा
एवढेतरी करून जा
हा वसंत आवरून जा
ही न रीत मोहरायची
आसवांत मोहरून जा
तारकांपल्याड जायचे
ह्या नभास विस्मरून जा
ये उचंबळून अंतरी
सावकाश ओसरून जा
ह्या हवेत चंद्रगारवा..
तू पहाट पांघरून जा
ये सख्या, उदास मी उभी
आसमंत मंतरून जा
हा वसंत आवरून जा
ही न रीत मोहरायची
आसवांत मोहरून जा
तारकांपल्याड जायचे
ह्या नभास विस्मरून जा
ये उचंबळून अंतरी
सावकाश ओसरून जा
ह्या हवेत चंद्रगारवा..
तू पहाट पांघरून जा
ये सख्या, उदास मी उभी
आसमंत मंतरून जा
गीत | - | सुरेश भट |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | पद्मजा फेणाणी-जोगळेकर |
अल्बम | - | ही शुभ्र फुलांची ज्वाला |
गीत प्रकार | - | भावगीत |