A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गाडीवान दादा हो

गाडीवान दादा हो, गाडी ने भरारा
आज मला जायचे रे माझ्या माहेरा !

सोडायचे घर आज पहिल्यानी
टचकन्‌ डोळ्यांना आलं रे पाणी
डोळे पुसायाला आला माहेरचा ओळखीचा वारा !

सोनियाची पश्चिम डोंगराच्या मागे
तिथे माझ्या माउलीचे प्रेम रे उभे
आईसाठी घरट्याला जाईल पुन्हा पाखरू भरारा !

आई तुझी लेक नेली परक्यांनी
गंगेला मिळाले यमुनेचे पाणी
फिरून पुन्हा मिळेल मला माउलीच्या मायेचा उबारा !

नदीच्या काठाला बाबांचे घर
तिथे आठवणींची भरे घागर
दादासंगं जाईन पुन्हा पावसात वेचाया गारा !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.