गगना गंध आला
गगना गंध आला
मधुमास धुंद झाला
फुलले पलाश रानी
जळत्या ज्वाला
आले वनावनात
सहकार मोहरून
भ्रमरास मंजिरीची
चाहूल ये दुरून
भरला मरंद कोषी
भरला प्याला
वेलीस अंकुरांची
वलये किती सुरेख
लिहितात अंगुलींनी
वार्यात प्रेमलेख
संदेश प्रेमिकांना
दुरुनी आला
मधुमास धुंद झाला
फुलले पलाश रानी
जळत्या ज्वाला
आले वनावनात
सहकार मोहरून
भ्रमरास मंजिरीची
चाहूल ये दुरून
भरला मरंद कोषी
भरला प्याला
वेलीस अंकुरांची
वलये किती सुरेख
लिहितात अंगुलींनी
वार्यात प्रेमलेख
संदेश प्रेमिकांना
दुरुनी आला
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वराविष्कार | - | ∙ प्रभाकर कारेकर ∙ श्रीकांत पारगांवकर ∙ आरती अंकलीकर-टिकेकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | भावगीत |
अंगुली | - | बोट. |
पळस | - | पलाश. 'पळस' या झाडाला वसंत ऋतुत लाल-केशरी रंगाची फुले येतात. |
मंजिरी | - | मोहोर, तुरा. |
मरंद (मकरंद) | - | फुलातील मध. |
सहकार | - | आम्रवृक्ष. |