A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गणपती तू गुणपती तू

गणपती तू गुणपती तू नमन चरणी ईश्वरा
मी अडाणी भगत म्हणुनी दया करी या लेकरा

बोले तुणतुणं बोले हलगी
कडकड वाजे कडी ढोलकी
शाहीर कवनी जाई रमुनी, भरती जणू सूरसागरा

बहुजन मेळा थकला दमला
रसिक होउनी म्होरं जमला
कलाकृतीचा बागबगीचा, तरूतळी घेती आसरा

तू तर ठेवा सकल कलांचा
सुगंध तू तर शब्दफुलांचा
निराकार तू कलाकार मी, चुकभूल माझी सावरा
कवन - काव्य.
तुणतुणं - एक प्रकारचे तंतुवाद्य.
हलगी - खंजिरी. एक प्रकारचे वाद्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.