A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गंध फुलांचा गेला सांगून

गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मीलन, व्हावे मीलन

सहज एकदा जाताजाता, मिळुनी हसल्या अपुल्या नजरा
दो हृदयांच्या रेशीमगाठी प्रीत मोहना गेली बांधून

विरह संपता, मीलनाची अमृतगोडी चाखित असता
सखया अवचित जवळी येता, ढळे पापणी गेले लाजून

मनामनांच्या हर्षकळ्यांची आज गुलाबी फुले जाहली
वरमाला ही याच फुलांची गुंफून सखया तुलाच वाहीन