A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गौळणींनो जाउ नका बाजारी

दह्यादुधाची करितो चोरी, नंदाचा हरी
गौळणींनो, जाऊ नका बाजारी

नंदाघरचा कृष्ण सावळा
वाट अडवून उभा राहिला
गौळणींना ग छळतो भारी, खट्याळ गिरिधारी

रोज त्याला हवेच ग लोणी
करी मागणी हात पकडुनी
नकार देता शारंगपाणी करतो शिरजोरी

पदराशी लगटही करतो
दह्यादुधाचे घडे ग मागतो
खडे मारतो पळुनी जातो, कृष्ण करी मस्करी

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.