गीत लोपले तरी स्मृती सूरात
गीत लोपले तरी स्मृती सूरात दाटल्या
शिल्प भंगले तरी खुणा अभंग राहिल्या
एक भारली घडी मीलनात रंगली
एकदा जुळून वाट दूरदूर पांगली
धुंद रम्य दिपीका लोचनात जागल्या
आठवून ती कथा स्वप्न अश्रू ढाळिते
एक भावना अनाथ वेदनेत नाहते
फूल आज संपले विकल होती पाकळ्या
शाप आंधळा असा एकटाच साहतो
भेट जाहली तुझी हेच पुण्य मिरवितो
अंतरी तुझ्या स्मृती खोल खोल कोरल्या
शिल्प भंगले तरी खुणा अभंग राहिल्या
एक भारली घडी मीलनात रंगली
एकदा जुळून वाट दूरदूर पांगली
धुंद रम्य दिपीका लोचनात जागल्या
आठवून ती कथा स्वप्न अश्रू ढाळिते
एक भावना अनाथ वेदनेत नाहते
फूल आज संपले विकल होती पाकळ्या
शाप आंधळा असा एकटाच साहतो
भेट जाहली तुझी हेच पुण्य मिरवितो
अंतरी तुझ्या स्मृती खोल खोल कोरल्या
गीत | - | वंदना विटणकर |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया alka@aathavanitli-gani.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |
विकल | - | विव्हल. |