गेलो दत्तमयी होउनी
श्रीदत्ताचे नाम मुखी या माझ्या रात्रंदिनी
गेलो दत्तमयी होउनी
किती महिमा गावा गावा
चित्त आळवी एकच नावा
त्या नावातील सामर्थ्याने गेलो मी मोहुनी
ब्रह्मा विष्णू महेश यांचे
रूप त्रिमूर्ती एकच साचे
हृदयमंदिरी प्रतिष्ठापना झालेली पाहुनी
चरण दोन हे मार्ग दाविती
सहा करे सामर्थ्य अर्पिती
ईश्कृपेहुन काय मागणे मागावे मागुनी
गेलो दत्तमयी होउनी
किती महिमा गावा गावा
चित्त आळवी एकच नावा
त्या नावातील सामर्थ्याने गेलो मी मोहुनी
ब्रह्मा विष्णू महेश यांचे
रूप त्रिमूर्ती एकच साचे
हृदयमंदिरी प्रतिष्ठापना झालेली पाहुनी
चरण दोन हे मार्ग दाविती
सहा करे सामर्थ्य अर्पिती
ईश्कृपेहुन काय मागणे मागावे मागुनी
गीत | - | गिरीबाल |
संगीत | - | शांताराम पाबळकर |
स्वर | - | आर. एन्. पराडकर |
गीत प्रकार | - | दिगंबरा दिगंबरा, भक्तीगीत |
साच | - | खरे, सत्य. |