घडून जे गेले ते
घडून जे गेले ते, घडेल का फिरुनि ते?
कसे पुन्हा उमलावे सुकलेले नाते?
कशा जुळाव्या रेशमी गाठी?
कशा मिळाव्या चांदण्या राती?
दुरावले सुख जे, ते फिरून का भेटे?
क्षणी रुसणे क्षणी झुरणे, क्षणामधे हसणे
मनोगतांचे बोलके गाणे
न बोलता हृदयीचे स्वराविना गाते
कसे पुन्हा उमलावे सुकलेले नाते?
कशा जुळाव्या रेशमी गाठी?
कशा मिळाव्या चांदण्या राती?
दुरावले सुख जे, ते फिरून का भेटे?
क्षणी रुसणे क्षणी झुरणे, क्षणामधे हसणे
मनोगतांचे बोलके गाणे
न बोलता हृदयीचे स्वराविना गाते
| गीत | - | सुधीर मोघे |
| संगीत | - | प्रभाकर जोग |
| स्वर | - | अनुराधा पौडवाल |
| चित्रपट | - | चांदणे शिंपीत जा |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












अनुराधा पौडवाल