A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गोविंद गोविंद

गोविंद गोविंद ।
मना लागलिया छंद ॥१॥

मग गोविंद ते काया ।
भेद नाही देवा तया ॥२॥

आनंदले मन ।
प्रेमें पाझरती लोचन ॥३॥

तुका ह्मणे आळी ।
जेवी नुरेचि वेगळी ॥४॥