A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गोविंदा रे गोपाळा

गोविंदा रे गोपाळा
छंद तुझा जडला घननीळा

जगजेठी हा बनुनी गुराखी
पाठीवरती घोंगडी टाकी
यमुनातीराला नेतो कपिला
असा हा हरी सावळा

व्याकुळ अंतर राही निरंतर
नयनीचे नीर झरते झरझर
दर्शन दे रे आता मजला
तुझ्या दासा नंदलाला
कपिला - पिंगट रंगाची किंवा सबंध शरीरभर कोणत्या तरी एका रंगाची गाय.
जगजेठी - जगतात ज्येष्ठ असा तो, परमेश्वर.
नीर - पाणी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.