A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गुज ओठांनी ओठांना

गुज ओठांनी ओठांना सांगायचं
एका पावसात दोघांनी भिजायचं

तसं कधीचं आभाळ आलंय भरून
जळ ढगात सांकळे केव्हापासून
वेडं उधाण कशाला रोखायचं

खुळा पाऊस डसेल सर्वांगाला
आता नको किनारा आवेगाला
धुंद धारांच्या रानात घुसायचं

गाणं मनातलं पावसात येईल फुलून
तुझ्यामाझ्यातलं अंतर जाईल पुसून
बीज नवीन गाण्याचं पेरायचं
सांकळणे - गोठणे.

 

Random song suggestion
  उषा मंगेशकर