गुपित मनीचे राया
गुपित मनीचे राया सांगते तुला
हे तू नकोस सांगू कुणा
तुजविण मज कुणि नाही सजणा
हे तू नकोस सांगू कुणा
एकान्ती अनुरागी हृदयीचे गुंफुन धागे
दिल माझे तुजसंगे मज घेऊन आले वेगे
मन सांगताना माझे आढेवाढे घेते
क्षण माझे नच ठावे प्रीतीला काय म्हणावे
तुजपाशी मी यावे अन् जवळी मला तू घ्यावे
तुला पाहताना हे ऐसे कैसे व्हावे
हे तू नकोस सांगू कुणा
तुजविण मज कुणि नाही सजणा
हे तू नकोस सांगू कुणा
एकान्ती अनुरागी हृदयीचे गुंफुन धागे
दिल माझे तुजसंगे मज घेऊन आले वेगे
मन सांगताना माझे आढेवाढे घेते
क्षण माझे नच ठावे प्रीतीला काय म्हणावे
तुजपाशी मी यावे अन् जवळी मला तू घ्यावे
तुला पाहताना हे ऐसे कैसे व्हावे
गीत | - | रमेश अणावकर |
संगीत | - | डी. एस्. रुबेन |
स्वर | - | कृष्णा कल्ले |
चित्रपट | - | पैसा बोलतो आहे |
गीत प्रकार | - | चित्रगीत, मना तुझे मनोगत |
अनुराग | - | प्रेम, निष्ठा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.