A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हा कारवा चालला

वाटा विराण्या, झाल्या दिवाण्या,
सोडुनिया गाव येथला,
हा कारवा चालला..

येथे कुणी न राहिले
न प्रीत राहिली,
सार्‍या दिशाच पेटल्या
उरांत काहिली,
झाला विरागी जिव्हाळा..

आता पुन्हा न मागुती
वळून पाहणे,
गाथा अपूर्ण प्रीतीची
कुणा सांगणे?
त्यजावी उदासी जगाला..
गीत -
संगीत -
स्वर- हेमंतकुमार
गीत प्रकार - भावगीत

 

Print option will come back soon