हांस हांस रे हृदया
हांस हांस रे । हृदया, तुज केवि हांसवू ॥
गाऊ कुणा संगीत मी ।
हांसू अतां कुणा सवें मी ।
तुज आता कसें आळवू? ॥
सरलें सुख काय आज रे । प्राक्तनि अपुल्या ।
उधळलि पूजा माझी । प्रीतिची कुणी रे ।
नकळे तुज केवि शांतवू? ॥
गाऊ कुणा संगीत मी ।
हांसू अतां कुणा सवें मी ।
तुज आता कसें आळवू? ॥
सरलें सुख काय आज रे । प्राक्तनि अपुल्या ।
उधळलि पूजा माझी । प्रीतिची कुणी रे ।
नकळे तुज केवि शांतवू? ॥
गीत | - | मो. ग. रांगणेकर |
संगीत | - | मास्टर कृष्णराव |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे |
नाटक | - | एक होता म्हातारा |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
केविं | - | कशा प्रकारे. |