हरी भक्तिचा भुकेला
हरीभोवती नित्य नाचतो
भक्तांचा मेळा
हरी भक्तिचा भुकेला
पहाटसमयी जात्यावरती
दळू लागला जनीसंगती
ओवी गाऊन हा जगजेठी
भक्ताघरी रंगला
घास घेई नारायणा
नामदेव तो हट्ट सोडिना
श्रीपतिराणा त्रिभुवनाचा
भक्तासवे जेवला
कबिराघरचे विणले शेले
भक्त-प्रभु ते एकची झाले
भक्तासवे त्या प्रभु नाचले
घेउनी भक्ति-ध्वजा
भक्तांचा मेळा
हरी भक्तिचा भुकेला
पहाटसमयी जात्यावरती
दळू लागला जनीसंगती
ओवी गाऊन हा जगजेठी
भक्ताघरी रंगला
घास घेई नारायणा
नामदेव तो हट्ट सोडिना
श्रीपतिराणा त्रिभुवनाचा
भक्तासवे जेवला
कबिराघरचे विणले शेले
भक्त-प्रभु ते एकची झाले
भक्तासवे त्या प्रभु नाचले
घेउनी भक्ति-ध्वजा
गीत | - | योगेश्वर अभ्यंकर |
संगीत | - | गोविंद पोवळे |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भक्तीगीत |
जगजेठी | - | जगतात ज्येष्ठ असा तो, परमेश्वर. |