A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हरि थेंब घे रे दुधाचा

हरि थेंब घे रे दुधाचा
चांदण्याचा रंग याचा, गोडवा रे मधाचा !

सोनियाची बाळवाटी
सोनियाची शिंप छोटी
वाटीमध्ये ओघ साचे वात्सल्याच्या नदाचा !

फूल फुले आपसूक
उघडी रे तसे मुख
थांबु दे ना चाळा थोडा सावळ्या या पदांचा !

गोकुळीच्या गाउलीचा
नंदिनीच्या माउलीचा
तुझियासाठी अमृताचा घडा भरे रे सदाचा !
नद - मोठी नदी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.