हरी तुझी कळली चतुराई
हरी तुझी कळली चतुराई
हरी रे, भुलायची मी नाही
गायीमागं गोप दवडुनी
लाखांमधली एक निवडुनी
आडरानी या मला अडवुनी, दाविसी धिटाई
गरीब भोळ्या जरी गवळणी
खोडि काढता होउ नागिणी
बळेच घेसी निंदा ओढुनि, काय रे तर्हा ही
मी न एकटी इथे मोहना
जिवंत पुढती वाहे यमुना
धावुन येईल माझ्या वचना, हिरवी वनराई
हरी रे, भुलायची मी नाही
गायीमागं गोप दवडुनी
लाखांमधली एक निवडुनी
आडरानी या मला अडवुनी, दाविसी धिटाई
गरीब भोळ्या जरी गवळणी
खोडि काढता होउ नागिणी
बळेच घेसी निंदा ओढुनि, काय रे तर्हा ही
मी न एकटी इथे मोहना
जिवंत पुढती वाहे यमुना
धावुन येईल माझ्या वचना, हिरवी वनराई
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | जशास तसे |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर |
गोप | - | गुराखी. |
Print option will come back soon