A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हसले ग बाई हसले

हसले ग बाई हसले अन्‌ कायमची मी फसले

नयनकवडसा टाकुन कुणीतरी, दिपवी माझे लबाड डोळे
प्रीत-मधाचे सुंदर पोळे, हृदयी शिरुनी चोरून नेले

सांगायाची चोरी झाली, आई विचारी काय जहाले
चिडले रुसले माझ्यावर मी, मलाच होते हरवुन बसले

पाळत ठेवुन त्या लुच्‍च्‍याला, धरुनी बांधून खेचित नेले
वाजतगाजत कैदी केले, शासन करता घरास मुकले
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभु
स्वर- लता मंगेशकर
गीत प्रकार - भावगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.