A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हासत वसंत ये वनी

हासत वसंत ये वनी
अलबेला!
प्रियकर पसंत हा मनी
धरणीला!

घनवनराई, बहरुनि येई
कोमल मंजुळ कोयल गाई
आंबा पाही फुलला
चाफा झाला पिवळा
जाईजुई चमेलीला
भर आला शेवंतीला
घमघमला!

सतेज टवटवली
कळी जशी कवळी
चंद्रकोर इवली
नभात लुकलुकली
आला शीतळ वारा
बरसत अमृतधारा
मृदुल फुलांचा करी-
झुला!

 

  जयश्री, वसंत देसाई