A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हाती नाही बळ

हाती नाही बळ, दारी नाही आड
त्याने फुलझाड लावू नये !

घालवेना चारा, होई ना जतन
त्याने तो गोधन पाळू नये !

सोसता सोसेना संसाराचा ताप
त्याने मायबाप होऊ नये !

नामसंकीर्तना गवसेना वेळ
त्याने गळा माळ घालू नये !