हे चिंचेचे झाड दिसे मज
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी !
बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे
हे गवत नव्हे गे पिवळे केशर मळे
ही किमया केवळ घडते प्रीतीमुळे
उघडे डोंगर आज हिमाचे मुकुट घालिती शिरी
रुसलीस उगा का जवळी येना जरा
गा गीत बुल्बुला माझ्या चित्तपाखरा
हा राग खरा की नखर्याचा मोहरा
कितीवार मी मरू तुझ्यावर किती करू शाहिरी
हर रंग दाविती गुलाब गहिरे फिके
तुज दाल सरोवर दिसते का लाडके
पाण्यात तरंगे घरकुलसे होडके
त्यात बैसुनी मधुचंद्राची रात करू साजिरी
दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी !
बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे
हे गवत नव्हे गे पिवळे केशर मळे
ही किमया केवळ घडते प्रीतीमुळे
उघडे डोंगर आज हिमाचे मुकुट घालिती शिरी
रुसलीस उगा का जवळी येना जरा
गा गीत बुल्बुला माझ्या चित्तपाखरा
हा राग खरा की नखर्याचा मोहरा
कितीवार मी मरू तुझ्यावर किती करू शाहिरी
हर रंग दाविती गुलाब गहिरे फिके
तुज दाल सरोवर दिसते का लाडके
पाण्यात तरंगे घरकुलसे होडके
त्यात बैसुनी मधुचंद्राची रात करू साजिरी
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | एन्. दत्ता |
स्वर | - | महेंद्र कपूर |
चित्रपट | - | मधुचंद्र |
गीत प्रकार | - | चित्रगीत |