A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे शिवशंकर गिरिजा तनया

हे शिवशंकर गिरिजा तनया गणनायका प्रभुवरा
शुभकार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा

प्रसन्‍न होऊन विघ्‍न हरावे
नम्र कलेचे सार्थक व्हावे
तुझ्या कृपेने यश कीर्तिचा बहर येऊ दे भरा

वंदन करुनी तुजला देवा
रसिकजनांची करितो सेवा
कौतुक होउनी आम्हा मिळावा सन्मानाचा तुरा