हे तुझे अशा वेळी लाजणे
हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही
जे तुला दिले होते, तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही
ऐक तू जरा माझे, सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही.
आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही
जे तुला दिले होते, तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही
ऐक तू जरा माझे, सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही.
आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही
गीत | - | सुरेश भट |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | दशरथ पुजारी |
गीत प्रकार | - | कविता |