A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे विश्वच वाचाळांचे

हे विश्वच वाचाळांचे वेधित शब्द-शर येती
बेचैन कशाला व्हावे? सरतील उगा मधुराती

प्रत्येक उष:कालाची रात्रीत सांगता होते
पतिव्रता अहिल्या सीता होतात कलंकित जेथे
थैमान घालिते वारे, जळतात संथ परि ज्योती

कंठशोष करिती जे जे, ते याच पथावर येती
लपवीत पातकी चेहरे गल्लीतून माड्या चढती
मुखवटेच निष्पापांचे या जगी पहाया मिळती

बागेत अफुच्या रुजते कधी तुळस कोवळी हळवी
पापात बुडल्या नेत्रा पावनता कुठुन दिसावी
गातात पाठ पुण्याचे पथ तेच विसरुनी जाती

जनरीत अशी ही इथली का उगा दुभंगून जावे?
शिशिरी जरी गळती पाने तरी पुन्हा वसंत फुलावे
हे असे धुंद जगण्याचे क्षण युगायुगांतून येती
कंठशोष - घसा कोरडा करणे, व्यर्थ सांगणे.
शर - बाण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.