A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ही पोली साजुक तुपातली

पैल्या धारेच्या प्रेमाने साला
काळीज केलाया बाद
ही पोली साजुक तुपातली-
तिला म्हावर्‍याचा नाद

आरून आरून करू नको इशारा
भिडू दे आता डोल्याला डोला
हितं बी ठिनगी तिथं बी ठिनगी
जोसानं पेटू दे आग
ही पोली साजुक तुपातली-
तिला म्हावर्‍याचा नाद

चोरून जरी ह्यो गेटमेट झाला
खबर झायली कोली वार्‍याला
लागलाया आता तोल सुटाया
इस्काची फुटलीया लाट
ही पोली साजुक तुपातली-
तिला म्हावर्‍याचा नाद
गीत- गुरु ठाकूर
संगीत - चिनार-महेश
स्वर - रेशमा सोनवणे
चित्रपट- टाईमपास
गीत प्रकार - चित्रगीत कोळीगीत

 

Random song suggestion
  रेशमा सोनवणे