A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ही नाव रिकामी उभी

ही नाव रिकामी उभी किनार्‍याला
मी कशी वल्हवू तुझ्याविना दर्याला?

या चांदण्यात लाटा चमकती रुपेरी रंगानं
खळखळ दरियाची- हसणं असेल पिरतीनं
तू येताच नाव माझी-
घेऊन गिरकी लागेल सुरुसुरु धावायला

झणझण झोंबंल रातीचा वारा तुझ्या ग अंगाला
जवळ जवळ ग सरकशील तू मलाच बिलगायला
गुपीत मनचं सांगीन झटकन्‌ तुला ग कानाला

क्षणांत कळी तुझी खुलेल ग
मोरावाणी नाव माझी डुलेल
मन माझं फुलेल
हसेल ग, फुलेल ग, नावेत तुझ्यासंगं फिरण्याला
गीत- विहंग
संगीत - द. म. मारुलकर
स्वर - बबनराव नावडीकर
गीत प्रकार - कोळीगीत