ही तुमची भारतमाता
हे भारतीयांनो ऐका, बलिदान कथा वीरांच्या
झुंजता निमाले दीप, सागरात अंधाराच्या
त्या चिरंजीव आत्म्यांनी, रक्ताने लिहिली गाथा
ही तुमची भारतमाता, ही माझी भारतमाता
जय जवान जय किसान
जे प्राणपणाने लढले, युद्धातच कामी आले
आत्म्यास लाभता मुक्ती देहाचे सोने झाले
ऐकता कहाणी त्यांची अंगावरी येतो काटा
ती पहा फोडिते टाहो, वीराची विधवा पत्नी
कोमेजून निजली सारी भवतीने बाळे चिमणी
हे चित्र ठेवुनी मागे तो निघुनी गेला त्राता
भडिमार उडे तोफांचा सरसावून सीमेवरती
धिप्पाड वज्रदेहांच्या बांधल्या जणू तट-भिंती
बेहोष होउनी लढले, गुणगान आईचे गाता
ठिणगीला भिडली ठिणगी, पेटली भारती जिद्द
विध्वंसी क्रांतीसंगे संयमी शांतीचे युद्ध
हरएक शिपाई झाला जणू भारतभाग्य विधाता
त्या ज्वलंत इतिहासाचे प्रत्येक पान सोनेरी
या शब्दाशब्दांमधुनी झडतील उद्या रणभेरी
व्हा पुढे राष्ट्रवीरांनो उंचावून आपुला माथा
घेऊन झेप वाघाची शत्रूवरती तुटुनी पडला
पाहून तेज शिवबाचे सह्याद्री जागा झाला
घ्या शपथ मायभूमीची ठेचण्या पाशवी सत्ता
झुंजता निमाले दीप, सागरात अंधाराच्या
त्या चिरंजीव आत्म्यांनी, रक्ताने लिहिली गाथा
ही तुमची भारतमाता, ही माझी भारतमाता
जय जवान जय किसान
जे प्राणपणाने लढले, युद्धातच कामी आले
आत्म्यास लाभता मुक्ती देहाचे सोने झाले
ऐकता कहाणी त्यांची अंगावरी येतो काटा
ती पहा फोडिते टाहो, वीराची विधवा पत्नी
कोमेजून निजली सारी भवतीने बाळे चिमणी
हे चित्र ठेवुनी मागे तो निघुनी गेला त्राता
भडिमार उडे तोफांचा सरसावून सीमेवरती
धिप्पाड वज्रदेहांच्या बांधल्या जणू तट-भिंती
बेहोष होउनी लढले, गुणगान आईचे गाता
ठिणगीला भिडली ठिणगी, पेटली भारती जिद्द
विध्वंसी क्रांतीसंगे संयमी शांतीचे युद्ध
हरएक शिपाई झाला जणू भारतभाग्य विधाता
त्या ज्वलंत इतिहासाचे प्रत्येक पान सोनेरी
या शब्दाशब्दांमधुनी झडतील उद्या रणभेरी
व्हा पुढे राष्ट्रवीरांनो उंचावून आपुला माथा
घेऊन झेप वाघाची शत्रूवरती तुटुनी पडला
पाहून तेज शिवबाचे सह्याद्री जागा झाला
घ्या शपथ मायभूमीची ठेचण्या पाशवी सत्ता
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | महेंद्र कपूर |
चित्रपट | - | शेवटचा मालुसरा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, स्फूर्ती गीत |
निमणे | - | लय पावणे / मरणे. |
भेर | - | मोठा नगारा. नौबत. |