A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हाऊस ऑफ बॅम्बू

नंबर फिफ्टि फोर, दि हाऊस विथ दि बॅम्बू डोअर !
बांबूचे घर बांबूचे दार बांबूची जमीन पिवळीशार !

बांबूच्या वनात वार्‍याचा सूर
जिवाला नेतो भुलवुनी दूर !
हाऊस ऑफ बॅम्बू !

बांबूच्या वनात झर्‍याच्या काठी
येशील सजणे माझ्याच पाठी !

बांबूच्या घरात स्वप्‍नाचा झूला
झुलवित राहील तुला नि मला !
हाऊस ऑफ बॅम्बू !
नंबर फिफ्टी फोर, दि हाऊस विथ दि बॅम्बू डोअर !

बांबूचे घर पहायला हवे
बांबूच्या घरात रहायला हवे !

रूपाचा उजेड डोळ्यांचा दिवा
बांबूच्या घरात तेवायला हवा !
हाऊस ऑफ बॅम्बू !
नंबर फिफ्टि फोर, दि हाऊस विथ दि बॅम्बू डोर !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.