A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
इथे मिळाली सागर-सरिता

इथे मिळाली सागर-सरिता, ही प्रीतीची एकरूपता
इथे मिळाली!

कमलफुलांचे सुगंध सिंचन की भ्रमराला गोड निमंत्रण
मिटे पाकळी मीलन घडतां, ही प्रीतीची एकरूपता
इथे मिळाली!

या धरणीची हाक ऐकिली, निळे गगन हे झुकलें खाली
क्षितिजावरही प्रेम सांगता, ही प्रीतीची एकरूपता
इथे मिळाली!

बांधु अपुले घरकुल चिमणे, तुझियासाठी माझे जगणे
मरणां येईल चिरंजीविता, ही प्रीतीची एकरूपता
इथे मिळाली!
सांगता - पूर्णता.
सिंचन - शिंपणे.

 

  कृष्णा कल्ले, महेंद्र कपूर