जा घनांनो जा
तृप्तीचा फुलवीत पिसारा सळसळता ताजा
जा घनांनो जा
तहानलेल्या तप्त जिवाला
अमृतमय आधार मिळाला
अशीच तुमची शीतल छाया या मातीला द्या
जा घनांनो जा
नवल फुलले नवसृजनाचे
हिरवे कौतुक आता नव्याचे
रंग असे हे शुभशकुनाचे पुन्हा पुन्हा उधळा
जा घनांनो जा
जा घनांनो जा
तहानलेल्या तप्त जिवाला
अमृतमय आधार मिळाला
अशीच तुमची शीतल छाया या मातीला द्या
जा घनांनो जा
नवल फुलले नवसृजनाचे
हिरवे कौतुक आता नव्याचे
रंग असे हे शुभशकुनाचे पुन्हा पुन्हा उधळा
जा घनांनो जा
गीत | - | चंद्रशेखर सानेकर |
संगीत | - | अवधूत गुप्ते |
स्वर | - | अवधूत गुप्ते |
गीत प्रकार | - | भावगीत, ऋतू बरवा |
सृजन | - | निर्मिती. |