जा रे चंद्रा तुडवित मेघा
जा रे चंद्रा, तुडवित मेघा उधळित रथ अपुला
सांग सख्याला बसले लावुनी डोळे वाटेला
रात चांदणी ही शरदाची
करिते माझ्या आग जिवाची
शपथ तुला रे तव रोहिणीची, घेउनी ये त्याला
सांग सख्याला माझी कहाणी
दिवस गुजरिते आसूं पिउनी
कुशल तरी ये त्यांचे घेउनी सांगाया मजला
इथे एकली पाहुन मजला
हसू नको रे उगीच खट्याळा
विसरलास का कलंक अपुला गुरुशापे जडला
सांग सख्याला बसले लावुनी डोळे वाटेला
रात चांदणी ही शरदाची
करिते माझ्या आग जिवाची
शपथ तुला रे तव रोहिणीची, घेउनी ये त्याला
सांग सख्याला माझी कहाणी
दिवस गुजरिते आसूं पिउनी
कुशल तरी ये त्यांचे घेउनी सांगाया मजला
इथे एकली पाहुन मजला
हसू नको रे उगीच खट्याळा
विसरलास का कलंक अपुला गुरुशापे जडला
गीत | - | मा. ग. पातकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | गजानन वाटवे |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, भावगीत, नयनांच्या कोंदणी |