जादुगारिणी सखे साजणी
जादुगारिणी सखे साजणी
थांब जराशी ग
प्रेमभाव नजरेत दाविले
तूच आधी मज नादी लावले
गोड हसुनिया हृदयी फुलवल्या गुलाब-राशी ग
तुझ्या संगती गिरिकंदरही
राजमंदिराहुन सुखदायी
तू माझी तर तुच्छ अवांतर सौख्य-मिराशी ग
दोन जिवाचे जातक जुळले
भाग्यलेख प्रीतिने उजळले
जगास मानू उगा, जुमानू का ग्रहराशी ग
स्फूर्ति-तारका तू झगमगती
करू जोडीने प्रवास जगती
सदा बिलगली हीच एकली आस उराशी ग
थांब जराशी ग
प्रेमभाव नजरेत दाविले
तूच आधी मज नादी लावले
गोड हसुनिया हृदयी फुलवल्या गुलाब-राशी ग
तुझ्या संगती गिरिकंदरही
राजमंदिराहुन सुखदायी
तू माझी तर तुच्छ अवांतर सौख्य-मिराशी ग
दोन जिवाचे जातक जुळले
भाग्यलेख प्रीतिने उजळले
जगास मानू उगा, जुमानू का ग्रहराशी ग
स्फूर्ति-तारका तू झगमगती
करू जोडीने प्रवास जगती
सदा बिलगली हीच एकली आस उराशी ग
| गीत | - | स. अ. शुक्ल |
| संगीत | - | जी. एन्. जोशी |
| स्वर | - | जी. एन्. जोशी |
| गीत प्रकार | - | भावगीत |
| गिरिकंदर | - | डोंगरातली गुहा. |
| जातक | - | जन्मकाळाच्या ग्रहांच्या स्थितीवरून माणसाच्या आयुष्यात घडणार्या शुभाशुभ गोष्टींविषयीचे वर्णन करणारा ज्योतिषशास्त्राचा एक विषय. |
| मिराशी | - | वतनदार. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












जी. एन्. जोशी