जाईजुईचा गंध
आषाढाला पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा
दु:ख भिरकावून येती शब्द माहेरपणाला
शब्द माहेरपणाला, नवा गांधार जिण्याला
मेघूटांच्या पालखीनं डोळे गेले आभाळाला
जाईजुईचा गंध मातीला
हिरव्या झाडांचा छंद गीताला
पानांवरती सांडले मोती
ओलं आभाळ आलं भेटीला
रूपदेखणी झाडीत कुणी
सर्व्या रानाचा जीव चांगला
आंबेराईत, डोळे मोडीत
कुणी डोळ्यांचा झुला बांधला
दु:ख भिरकावून येती शब्द माहेरपणाला
शब्द माहेरपणाला, नवा गांधार जिण्याला
मेघूटांच्या पालखीनं डोळे गेले आभाळाला
जाईजुईचा गंध मातीला
हिरव्या झाडांचा छंद गीताला
पानांवरती सांडले मोती
ओलं आभाळ आलं भेटीला
रूपदेखणी झाडीत कुणी
सर्व्या रानाचा जीव चांगला
आंबेराईत, डोळे मोडीत
कुणी डोळ्यांचा झुला बांधला
गीत | - | ना. धों. महानोर |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | जयश्री शिवराम |
चित्रपट | - | मुक्ता |
गीत प्रकार | - | चित्रगीत, ऋतू बरवा |
डोळे मोडणे | - | डोळ्यांनी खुणा करणे, नखर्यांनी पाहणे. |
पाणकळा | - | पाऊस. |