A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जरा हळू जपून चल

जरा हळू जपून चल बाई ग
करू नको उगीच अशी घाई ग

यौवनप्रांतात पडे पाऊल पहिलेच गडे
नंदनवन जग भासे छंद नवा गोड जडे
बहरली नवति नवलाई ग

हृदय-कुंजि मंजुळशी प्रणय-बासरी घुमली
अधीर वृत्ती रंगुनि नव भाव-गुंजनी रमली
मोहरली जिवाची आमराई ग

सरळ सुखद दिसला तरी प्रणयमार्ग बिकट महा
गंध मधुर मादक तरि फुलवरा विषारिच हा
काटेकुटे लपले ठायि ठायी ग
गीत - स. अ. शुक्ल
संगीत - जी. एन्‌. जोशी
स्वर- लीला लिमये
गीत प्रकार - भावगीत
कुंज - वेलींचा मांडव.
ठाय - स्थान, ठिकाण.
नवती - तारुण्याचा भर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.