जाशि कुठे नवनित-चोरा
मुरलीधर चित्तचकोरा रे
जाशि कुठे नवनित-चोरा रे
आज तुझी ना होइल सुटका
फोडुनि बघ तू गोरस-मटका
किती करशिल शिरजोरी असता तुझ्याभोवती घेरा रे
असेल राधा गौळण वेडी
करू नको अमुच्याशी खोडी
सांगताच येईल यशोदा हाती घेउनि झारा रे
ऐक सांगते अता शेवटी
मंजुळ पावा धरुनी ओठी
घुमवशील तेव्हांच तुला रे सोडू नंदकुमारा रे
जाशि कुठे नवनित-चोरा रे
आज तुझी ना होइल सुटका
फोडुनि बघ तू गोरस-मटका
किती करशिल शिरजोरी असता तुझ्याभोवती घेरा रे
असेल राधा गौळण वेडी
करू नको अमुच्याशी खोडी
सांगताच येईल यशोदा हाती घेउनि झारा रे
ऐक सांगते अता शेवटी
मंजुळ पावा धरुनी ओठी
घुमवशील तेव्हांच तुला रे सोडू नंदकुमारा रे
गीत | - | अण्णा जोशी |
संगीत | - | नीळकंठ अभ्यंकर |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | भावगीत, हे श्यामसुंदर |
गोरस | - | दूध. |
नवनीत | - | लोणी. |
पावा | - | बासरी, वेणु. |