जय गणनायक सिद्धीविनायक
जय गणनायक, सिद्धीविनायक, सुखवरदायक तुज नमितो
गजमूख धारक, तू जग पालक, मी तव बालक तुज नमितो
गण गौळण झाली सुरू, पायी घुंगरू, लागे थरथरू, उडाली घाई
सूर तालाला मारी मिठी, दिठीला दिठी, फुटावी ओठी शब्दांची लाही
सभाजनांची झाली गर्दी, जमले बहु दर्दी, लागली वर्दी शिवाच्या कामी
गणगोत करुनी गोळा, नटेश्वर भोळा की लगबग आला कैलासावरुनी
संगती बाळ रूपडे, गजानन पुढे, बघतो चहूकडे कौतुकापोटी
द्या वरदान रसिकावरा, तुमच्या लेकरा, आशीर्वाद करा आस ही मोठी
तुम्ही उदार आश्रय दिला, म्हणुनी ही कला, जगाला दिसली
अन् जोवरी तुमची कृपा, तोवर वाण अम्हांला कसली

गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | बालकराम |
चित्रपट | - | एक गाव बारा भानगडी |
गीत प्रकार | - | प्रथम तुला वंदितो, चित्रगीत, लोकगीत |
Print option will come back soon