जायचें असेल जरी
जायचें असेल जरी
नकळतां निघून जा
न कळतां निघून जा !
फूल फूल हुंगितां
चांदण्यांत गुंगतां
देहभान हरपतां खुशाल मजपुढून जा !
केशपाश सोडुनी
त्यांत वदन झाकुनीं
रुसुनि बैसतें तदा लपत छपत दूर जा !
गान गायिल्यावरी
बीन सारुनी दुरी
थकुनि नयन झाकितें त्या क्षणीं उठून जा !
क्षणिक जायचे असें
लागुं दे तुला पिसें
विरहिं मीलनी सुखें मजसि गुंगवून जा !
आणि जर अखेरचें
तुज असेल जायचें
जात जात पदतलीं प्राण हे चुरून जा !
नकळतां निघून जा
न कळतां निघून जा !
फूल फूल हुंगितां
चांदण्यांत गुंगतां
देहभान हरपतां खुशाल मजपुढून जा !
केशपाश सोडुनी
त्यांत वदन झाकुनीं
रुसुनि बैसतें तदा लपत छपत दूर जा !
गान गायिल्यावरी
बीन सारुनी दुरी
थकुनि नयन झाकितें त्या क्षणीं उठून जा !
क्षणिक जायचे असें
लागुं दे तुला पिसें
विरहिं मीलनी सुखें मजसि गुंगवून जा !
आणि जर अखेरचें
तुज असेल जायचें
जात जात पदतलीं प्राण हे चुरून जा !
| गीत | - | संजीवनी मराठे |
| संगीत | - | गजानन वाटवे |
| स्वर | - | अनुराधा मराठे |
| गीत प्रकार | - | भावगीत |
| बीन | - | एक तंतुवाद्य. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












अनुराधा मराठे