जिवाच्या जिवलगा नंदलाला
जिवाच्या जिवलगा नंदलाला रे
नंदलाला रे
यमुनेंत तुझ्यामाझ्या बिंब मुखांचें
बांसरींत तुझ्यामाझ्या गीत सुखाचें
स्मरणानें जीव माझा धुंद झाला रे
नंदलाला रे
चांदण्यांची नित्य नवी रासलीला रे
पांखरांच्या गळां नवी गीतमाला रे
कमलदळांत नवा गंध आला रे
नंदलाला रे
माझ्या कानीं ओळखीचा साद आला रे
प्रभू तुझ्या पावलांचा नाद झाला रे
धावलें मी तुझ्या पदवंदनाला रे
नंदलाला रे
नंदलाला रे
यमुनेंत तुझ्यामाझ्या बिंब मुखांचें
बांसरींत तुझ्यामाझ्या गीत सुखाचें
स्मरणानें जीव माझा धुंद झाला रे
नंदलाला रे
चांदण्यांची नित्य नवी रासलीला रे
पांखरांच्या गळां नवी गीतमाला रे
कमलदळांत नवा गंध आला रे
नंदलाला रे
माझ्या कानीं ओळखीचा साद आला रे
प्रभू तुझ्या पावलांचा नाद झाला रे
धावलें मी तुझ्या पदवंदनाला रे
नंदलाला रे
गीत | - | संजीवनी मराठे |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | मधुबाला जव्हेरी |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |