A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जेजुरीच्या खंडेराया जागराला

जेजुरीसम पुण्यक्षेत्र या नाही धरणीवरी
अन्‌ तिथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी

यळकोट यळकोट जय मल्हार

जेजुरीच्या खंडेराया जागराला या या
वाईच्या तू गणराया जागराला या या
पसरणीच्या भैरी देवा जागराला या या

जेजुरीगडा वाजे चौघडा वाजे चौघडा
पुणं धरती ही पलिकडं, गड जेजुरी अलिकडं

रूप दावून बानू गेली, स्वारी देवाची येडी झाली
बानूबाईचं याड लागलं, मल्हारी देव मल्हारी

इसरून गेला कुण्या गावाला भंडारी देव भंडारी
येळकोट येळकोट बोलती हो नितकाय भंडार उधळती
नवलाख पायरी गडाला हो, चिरा जोडिला खडकाला
बोला हो तुम्ही बोला, म्हाळसा नारीला

अन्‌ भंडारा वाहू देवाला हो मल्हारी रायाला
मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी

गळा घालितो भंडारी देव मल्हारी
मल्हारी मार्तंड जय मल्हार

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी
बानू नार आणली घरी मल्हारी रुसला का मजवरी
लखलख दिवट्या जळती, पाजळली दीपमाळ
रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी

कडेकपारी त्रिशूळ द्वारी वर उधळे भंडार
नाथ निरंजन सद्गुरू स्वामी घेतलासे अवतार
घेतलासे अवतार देवा लोटलासे भंडार
रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी

मल्हार धनी मी म्हाळसा राणी
कर जोडुनी लागतो चरणी
प्रीत नको तुजवरी, प्रीत नको तुजवरी
रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी
गीत - पारंपरिक
संगीत - मधुकर पाठक
स्वर- शाहीर साबळे
गीत प्रकार - लोकगीत
कपार - खबदड.
चिरा - बांधकामाचा दगड.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.