A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झाली ग बरसात फुलांची

झाली ग बरसात, फुलांची झाली ग बरसात
वसंतवेड्या लहरी भरल्या उसळत सर्वांगात

मुक्या मनाला फुटली वाणी
मनोगतांची झाली गाणी
पालवल्या ग आशावेली न्हाल्या नवरंगांत

धुंद सुखाचा सुटला दरवळ
अंगच अवघे झाले परिमळ
दंवासारखे आनंदासू कुसुमांसम नयनांत

तळहातीच्या भाकितरेखा
जित्या जुईच्या झाल्या शाखा
दिसेल तेथे प्रफुल्ल झाले फुलल्या उल्हासात
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
स्वर- आशा भोसले
चित्रपट - वरदक्षिणा
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.