A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झटकून टाक ती राख

हर हर महादेव !
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी !!

झटकून टाक ती राख, नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता
डोळ्यांत फुटे अंगार भगवा, रक्तात जागू दे आज भवानी माता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश
दाही दिशी घुमू दे शिवछत्रपतींचा घोष
लढण्या संग्राम आज हा
बळ दे या मनगटी अम्हां
करण्या संहार शत्रूचा, जन्म घे पुन्हा आता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

तलवार नाचते रणी ऐसा पेटतो राग
जगो-मरो जीव हा फुले महाराष्ट्राची बाग
जगण्या सिद्धांत आज हा
शक्ती दे शतपटी अम्हां
चल चल रे ऊठ घालिते साद मराठी आता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी