A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झुलतो झुला जाई आभाळा

झुलतो झुला, जाई आभाळा
झुल्यासंगे झुलताना खुलतो ग बाई गळा !

लिंबाच्या फांदीला
झुला मी बांधिला
रेशमाचे लाल गोंडे माझ्या झुल्याला !

खालती वरती
वार्‍याला भरती
विमानांच्या वेगे माझा झुला चालला !

झुल्याच्या संगती
सूरही रंगती
वारा नेई माझे गाणे दूर देशाला !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.