जुने फेकुनि नवीन घ्या
नगरवासिनो या हो या
जुने फेकुनि नवीन घ्या
जगावेगळा हा व्यापार
दानासाठी हा व्यवहार
पेठ लुटुनी सारी न्या
जुने फेकुनि नवीन घ्या
आणा, फेका, मळके लक्तर
घेऊनि जा हो दुकूल पिताम्बर
फुटके टाका, धडके घ्या
जुने फेकुनि नवीन घ्या
नक्षीदार ही पात्रे सुंदर
मुक्तकरे घ्या हिरे जवाहिर
दैन्य देउनी सौख्य घरी न्या
जुने फेकुनि नवीन घ्या
उघडे लक्ष्मीचे उद्यान
स्वर्णसंधीचा राखा मान
सान-थोर या, नर-नारी या
जुने फेकुनि नवीन घ्या
जुने फेकुनि नवीन घ्या
जगावेगळा हा व्यापार
दानासाठी हा व्यवहार
पेठ लुटुनी सारी न्या
जुने फेकुनि नवीन घ्या
आणा, फेका, मळके लक्तर
घेऊनि जा हो दुकूल पिताम्बर
फुटके टाका, धडके घ्या
जुने फेकुनि नवीन घ्या
नक्षीदार ही पात्रे सुंदर
मुक्तकरे घ्या हिरे जवाहिर
दैन्य देउनी सौख्य घरी न्या
जुने फेकुनि नवीन घ्या
उघडे लक्ष्मीचे उद्यान
स्वर्णसंधीचा राखा मान
सान-थोर या, नर-नारी या
जुने फेकुनि नवीन घ्या
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | मायाबाजार (ऊर्फ वत्सलाहरण) |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
दुकूल | - | रेशमी वस्त्र. |
सान | - | लहान. |