ज्या हरीवर मी प्रीती केली
ज्या हरीवर मी प्रीती केली, जडले ज्याचे पिसे
तयाला काळीज नाही कसे?
रूप-सूराला भुलुनी गेले
त्याच क्षणी मी त्याची झाले
सर्वस्वा मी वाहून बसले, करून घेतले हसे
तयाला काळीज नाही कसे?
एकांगी का प्रीत म्हणावी
फसगत माझी का समजावी
मीलन स्वप्ने किती बघावी, कुठवर सोडू उसासे
तयाला काळीज नाही कसे?
तयाला काळीज नाही कसे?
रूप-सूराला भुलुनी गेले
त्याच क्षणी मी त्याची झाले
सर्वस्वा मी वाहून बसले, करून घेतले हसे
तयाला काळीज नाही कसे?
एकांगी का प्रीत म्हणावी
फसगत माझी का समजावी
मीलन स्वप्ने किती बघावी, कुठवर सोडू उसासे
तयाला काळीज नाही कसे?
गीत | - | विनायक राहातेकर |
संगीत | - | स्नेहल भाटकर |
स्वर | - | उषा टिमोथी |
चित्रपट | - | बहकलेला ब्रह्मचारी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |